सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मृग नक्षत्रातही सोयगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढती झाल्याने आठवडाभरापूर्वी लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांची कोवळी अंकुर पाण्याआभावी होरपळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.ठिबक सिंचनवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांना पावसाची गरज असतांना ऐन मृगाच्या नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने मृग कोरडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कपाशी लागवडीत असलेल्या सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांनी बाळसे धरले आहे,परंतु या कोवळ्या अंकुरांना पहिल्या पाण्याची आवशकता असतांना,पावूस कोसळत नसल्याने पिकांची वाढीच्या काळातच स्थिती खराब झाली आहे विहिरींचा पाणीसाठा जेमतेम असल्याने ठिबक सिंचनवर तीन दिवसातून दोनवेळा पाणी भारती करण्याची स्थिती आहे.त्यातच उन्हाची तीव्रता कमी होत नसल्याने पिके चिंताग्रस्त झाली आहे.मृगच्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.
…………………………………….
0