औरंगाबाद: सोयगावला गटशिक्षण अधिकारी कार्यालयात निरोप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर पाटील यांची आरोग्य विभागात पदोन्नती झाल्याने त्यांना शुक्रवारी शिक्षण विभागाकडून निरोप देण्यात आला.
कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर पाटील यांची सोयगाव येथून पदोन्नती होवून चिकलठाण ता,कन्नड येथील आरोग्य केंद्रात बदली झाल्याने शुक्रवारी त्यांना निरोप देण्यात आला,यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र फुसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येवून त्यांना उत्कृष्ट सेवेबाद्दक्ल गौरविण्यात आले,यावेळी संजय पाटील,अनिल गुप्ता,राजू पाटील,प्रवीण पवार यांचेसह गटसाधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.आभार संजय पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *