सोयगाव,ता.३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावी करून गुन्हे दाखल करण्याच्या धमकी प्रकरणी त्या वादग्रस्त उपनिरीक्षकाचा सोमवारी सोयगावात निदर्शने करून निषेध करण्यात आला असून सिल्लोडला सोयगाव तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांची जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेवून कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान सोयगाव पोलीस ठाण्यातील त्या उपनिरीक्षकाचा सोयगाव-सिल्लोड तालुक्यात पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.
विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गीन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा छायाचित्र काढणाऱ्या पत्रकार भरत पगारे व इतर पत्रकारांना सोयगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी अरेरावी करून मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्न केल्याने त्यांच्या या कुत्याचा निषेध व्यक्त करण्यात येवून सोयगाव तहसील कार्यालयात कारवाईचे निवेदन देण्यात आले.सोयगाव पोलीस र्ठाण्यात पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांनाही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच्या तालुका शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.तर सिल्लोडला उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्दर्शन मुंडे यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या निवेदनावर भरत पगारे,राजू दुतोंडे,शेख गुलाब,शेख सुलेमान,विकास पाटील,नारायण चौधरी,विवेकानंद बागुल,प्रशांत चौधरी,शरद दामोधर,सागर बिऱ्हारे,अनिल रावलकर,दिनेश चोपडे,संभाजी पवार,दिलीप देसाई,आदींसह तालुक्यातील पत्रकारांचं स्वाक्षऱ्या आहे.
दरम्यान या प्रकरणात चौकशी करून दोन दिवसात संबंधित उपनिरीक्षाकावर कारवाई न झाल्यास जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर यांनी दिली.