राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आडस व वाघाळा येथील धाडीत 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याजवळ वाघाळा येथे व आडस या दोन ठिकाणी अवैधरित्या विक्री व वाहतुक होत असताना शनिवार,दि.15 जून रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास
राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 39 हजार 150 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत 16 ते 17 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर, परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत वाघाळा (ता.अंबाजोगाई) व आडस (ता.केज) या दोन ठिकाणी धाडी टाकून 2 गुन्हे नोंदवले. एका ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत.तर एका ठिकाणी आरोपी मिळून आला.महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत दोन्ही प्रकरणात वारस एक व बेवारस एक असे दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत वाघाळा येथे
रबरी टायरच्या ट्युब मध्ये 40 लिटर तर आडस येथे बेवारस स्थितीत 30 लिटर अशी एकूण 70 लिटर तयार हातभट्टी दारू,1 दुचाकी वाहन (एम.एच-44, जे-4348) असा एकूण 39 हजार 150 रूपये (एकोणचाळीस हजार एकशे पन्नास रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही नष्ट करण्यात आला.या दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,जवान बि. के.पाटील,वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *