बीड: अंबाजोगाई नगर परीषदेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

बेघरांना घरे,पिण्याचे पाणी द्या,अतिक्रमणे हटवा―कॉ.बब्रुवाहन पोटभरे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ‘शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोर-गरीब लोक यांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे,सर्व्हे नं.515 मधील न.प. मालकीची जागा ताबडतोब ताब्यात घेवून त्यावरील तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा,संबंधित अभियंत्याचा विभाग बदला,सर्व गलिच्छ वस्त्यांची स्वच्छता करा, शहराची अंतर्गत पाईप लाईन बदलून आठवड्यातून दोनदा पिण्याचे पाणी द्या’ या व इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.विविध निवेदने,अर्ज,विनंत्या करूनही या प्रश्नी न्याय मिळत नसल्याने अखेर कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोर-गरीब,मजुर लोकांनी सोमवार,दि. 17 जून रोजी नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

शासकीय जमीनीवर बेघरांना शासकीय ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून घरे मिळावीत या प्रमुख व इतर 6 मागण्यांसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे हे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे.विविध प्रकारे हे प्रश्न सोडून घेण्यासाठी कॉ.पोटभरे हे प्रयत्न करीत आहेत. परंतु,प्रशासन या बाबत उदासीन दिसत असल्याने पोटभरे यांनी 18 फेब्रुवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन ही केले.याप्रश्नी निदर्शने केली.निवेदने दिली. निवेदनाद्वारे नगरपरीषद प्रशासनास इशारा दिला होता.याबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांना कळविले होते.त्यानुसार आज सोमवार,दि.17 जून रोजी शिकलकरी समाज व वंचित घटकांतील शेकडो स्त्री-पुरूष,वयोवृद्ध नागरिक व लहान मुले,गोर-गरीब लोक यांनी रणरणत्या उन्हात मोर्चा काढून नगरपरीषदेसमोर निदर्शने केली.घोषणा दिल्या.कार्यालयात घुसून घेराव घातला. याप्रश्नी प्रशासनाने या लोकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा 25 जून नंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल.झालेल्या परिणामांना नगरपरीषद प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी यावेळी दिला आहे.तर मुख्याधिकारी यांच्या नांवे असलेले मागण्यांचे निवेदन न.प.अभियंता कस्तुरे यांनी स्विकारले. सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, पुनमसिंग टाक, छायाबाई तरकसे, गोरखसिंग भोंड, अस्मिता ओहाळ, दिपकसिंग गोके,पुजा मोरे,विरसिंग टाक, अनिल ओहाळ,अशोक ढवारे,तेजासिंग गोके,मिरा पाचपिंडे,मिरा जोगदंड आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.मोर्चात सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे,वंचित समाज बांधव हे सहभागी झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.