सरपंच परिषदेच्या मागणीला यश, मानधनासाठी 700 कोटींची तरतूद― नागरगोजे

बीड:आठवडा विशेष टीम― सरपंच परिषदेने गेल्या काही वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे नियमित पाठपुरावा केला. शेवटी परिषदेच्या मागणीला यश आले असून मानधन व इतर बाबी साठी 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नागरगोजे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांचेकडे सरपंच परिषदेने वेळोवेळी निवेदन देऊन मानधन व इतर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या होत्या.
बहु प्रतीक्षा असलेल्या सरपंच मानधन व इतर मागण्या मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मान्य केल्या व ठोस अशी 700 कोटी रुपयेची तरतूद केली.
सरपंच परिषद च्या वतीने आजच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री यांचे स्विय सहायक श्रीकांत भारती तसेच राज्य कार्यकारिणी चे प्रमुख जयंत पाटील, परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता काकड़े यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहे. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जनतेतुन सरपंच निवडण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आज मानधन वाढीसह इतर महत्त्वाच्या मागण्या मान्य करून महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे सरपंच यांना रुपये 5000 हजार मानधन मंजुर मिळणार आहे. त्याच बरोबर इतर सर्वच मागण्या जवळपास मान्य केल्या आहेत. परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास वेळ दिला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असल्याचेही नागरगोजे यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.