कडा ता.आष्टी:शेख सिराज―
तालुक्यातील धानोरा येथील साप्ताहिक तेजवार्ता व तेजवार्ता न्युज ईंन्टरटेनचे संपादक व पत्रकार सय्यद बबलू यांना स्वयंपूर्ण फाऊंडेशन अहमदनगर च्या वतीने गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात उत्कृष्ट बातम्याचे संकलित करून तेजवार्ता चॅनल च्या माध्यमातून संपादक सय्यद बबलू यांनी उत्कृष्ट वार्तांकन कार्य केल्या मुळे त्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आष्टी तालुक्यातील पञकार कासम शेख,सिराज शेख व ईतर विविध क्षेत्रातुन संपादक बब्लुभाई सय्यद यांचे होत आहे अभिनंदन.
0