गेल्या 14 वर्षांपासुन वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वृक्षरोपांचे वाटप ; वृक्षमिञ सुधाकर देशमुख यांचा विधायक उपक्रम

अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम― मागील 14 वर्षांपासुन वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची पुजा करणार्‍या महिला भगिनींना वृक्षरोप भेट देवून वृक्षारोप करण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी विधायक उपक्रम राबवत यावर्षी ही 114 वृक्षरोपांचे वाटप केले. त्यात बेल,अवळा, पिंपळ,वड,जांभळ, अंबा आणि विविध फुलांच्या रोपांचा समावेश आहे.या बाबत बोलताना वृक्षमिञ सुधाकर देशमुख म्हणाले की,प्रत्येकाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सीजन हवा आहे. तेव्हा प्रत्येकाने जबाबदारी ओळखून वृक्षरोपांची लागवड करावी.तसेच पर्यावरण संवर्धनासाठी शासनावर अवलंबुन राहू नका स्वतः वृक्षारोपनासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्या असे आवाहन करून यावेळी वृक्षमिञ सुधाकर देशमुख यांनी केले.

अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा (बुरूजाजवळ) येथे रविवार,दि.16 जून रोजी वृक्षमिञ अभियान व भगवान महावीर क्रीडा,सांस्कृतिक,युवा व्यायाम मंडळाच्या जगदगुरू संत तुकाराम महाराज रोपवाटिकेच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्यासाठी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांना वृक्षरोपांची भेट देण्यात आली.मागील अनेक वर्षांपासुन सुधाकर देशमुख हे वृक्षमिञ अभियान व भगवान महावीर क्रीडा, सांस्कृतिक,युवा व्यायाम मंडळाच्या जगदगुरू संत तुकाराम महाराज रोपवाटिकेच्या माध्यमातून वृक्षगणनेसाठी त्यांनी सनदशीर मार्गाने वेळोवेळी शासनस्तरांवर मुंबई-नागपुर या ठिकाणी विधिमंडळ अधिवेशन काळात विविध आंदोलने, उपोषण,निवेदने दिली आहेत.दरवर्षी पंढरपुर याञेनिमित्त पर्यावरण जनजागृतीसाठी ते दरवर्षी वृक्षदिंडी काढतात.यावर्षी ही वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. वटपौर्णिमेनिमित्त मागील 14 वर्षांपासुन ते प्रबोधनपर कार्यक्रम घेतात,व्यसनमुक्ती,
गुटखाबंदी,दारूबंदी,
हागणदारी मुक्त गांव, पाणी वाचवा,मुलगी वाचवा-मुलगी वाढवा, शेतकरी,आत्महत्या, पोवाडा,व्याख्यान, एकपाञी नाटक महापुरूषांच्या विचारांचा जागर करणे, प्रत्येकाच्या वाढदिवसाला वृक्षरोप भेट देतात.समाजातील निराधार तसेच अनाथांना मदत करणे, महिला सक्षमीकरण, बचतगट चळवळ वाढवणे,अंधश्रध्दा निर्मुलन,हुंडाबंदी, पर्यावरण जतन,संवर्धन करणे आदी विविध समाजप्रबोधनपर कार्ये संस्थेच्या वतीने करण्यात येतात. सुधाकर देशमुख हे ग्रामिण भागात प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.त्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून ‘रोप माझे,खड्डा माझा’ हा उपक्रम राबविला आहे. आजपर्यंत 27 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.त्यांनी शतकोटी वृक्ष लागवडीची सुरूवात 2002 ला केली.शासन ही योजना जशीच्या तशी 2009-2010 पासून राबवतेय.तसेच बहिणीला भाऊबीज ओवाळणी साठी देशमुख यांनी पुढाकार घेतला.शासनाने ही कल्पना प्रत्यक्षात 2015-16 पासून भाऊबीज योजनेच्या नांवाखाली सुरू केली आहे.यासोबतच वटसाविञी पौर्णिमा वृक्षदिन म्हणून साजरा करावा अशी त्यांनी गेल्या दहा वर्षांपुर्वीच केली होती त्याबाबतही शासनाने अंमलबजावणी केल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली आहे.त्यांच्या या कार्यास त्यांच्या सुविद्य पत्नी व संस्थेच्या सचिव सौ.मोहिनी सुधाकर देशमुख,मुलगा सुमोध देशमुख,मुलगी सृष्टी देशमुख आदींसह मित्र परिवार,नातेवाईक व समाजातील मान्यवरांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.