महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईमेलद्वारे निवेदन
बीड दि.०७:आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्र राज्यातील दऱ्याखोऱ्या मध्ये फिरणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळावर रोज हल्ले होत आहेत परंतु राज्य शासनाने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही त्या महाराष्ट्र राज्याचे ग्रह मंत्री अनिल देशमुख यांना केलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की राज्यातील दऱ्याखोऱ्यात वाड्या वस्त्यावर फिरणाऱ्या मेंढपाळांवर रोज मोठ्या प्रमाणात हल्ले होताना दिसत आहे त्यामुळे राज्यातील धनगर समाजाच्या मेंढपाळावर होणारे हल्ले तात्काळ रोखावे व मेंढपाळावर हल्ले करणाऱ्या गुंडावर कारवाई करण्यात यावी त्याच बरोबर राज्यातील वनविभागाच्या जागेत चरावू कुरणे उपलब्ध करून दयावे असे ग्राम मंत्री अनिल देशमुख यांना दिलेले ई-मेलमध्ये धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे की वेळोवेळी राज्य शासनाकडे याबाबत आम्ही पाठपुरावा केलेला आहे परंतु याकडे शासन मात्र कानाडोळा करताना दिसत आहे त्यामुळे आगामी काळात त्या प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा देखील या दिलेल्या ई-मेलमध्ये केला आहे पुढे त्यांनी म्हटले आहे यापुढे मेंढपाळांवर झालेल्या हल्ल्यातील कुटुंबीयांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व हल्ले करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे देखील ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदनात वाकसे यांनी म्हटले आहे.