सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव नगर पंचायतीच्या एका जागेसाठी दि.२३ मतदान होवू घातले असून एका जागेसाठी प्रभाग क्रमांक-१६ साठी दोन उमेदवार रिंगणात आहे.त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली असल्याने या पोट निवडणुकीत अचानक रंग राजकीय भरला आहे.
नगर पंचायतीच्या एका जागेसाठी भारती इंगळे(शिवसेना)आणि सिकंदर तडवी(अपक्ष)हे दोन उमेदवार रिंगणात असून दोघांनीही विजयाचा दावा केल्याने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी चुरस वाढली आहे.दरम्यान या एका जागेवर शहराच्या नगराध्यक्ष पदाची धुरा अवलंबून असल्याने एका जागेची लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.दरम्यान भाजपच्या ताब्यातून नुकतेच शिवसेनेने ऐनवेळी झालेल्या निवड प्रक्रियेतून नगराध्यक्ष पद ताब्यात घेतले असल्याने नगराध्यक्ष पद कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून अपक्ष उमेदवार विजयी झाल्यास शहराच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोयगावला निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे.