बीड ता ९:आठवडा विशेष टीम― माजी सैनिकाच्या विधवा पत्नी श्रीमती देवईबाई तुकाराम जायभाये रा.शिवणी, ता.जि.बीड यांच्या शेतात ये-जा करण्याचा रस्ता शेजारील शेतकरी देवदत्त शिंदे, गोरख शिंदे, आजिनाथ शिंदे, आसाराम शिंदे यांनी दिनांक २६ जुन २०१९ रोजी आडवला. गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी हास्तक्षेप करुनही रस्ता न मिळाल्यामुळे दिनांक ३ जुलै २०१९ रोजी देवईबाई यांनी मा. तहसिलदारांकडे अर्ज केला. वारंवार पाठपुरावा करुनही रस्ता न मिळाल्याने व तहसिलदारांच्या ऊद्धट बोलण्यामुळे दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी स्वतःच्या शेतातच ऊपोषणास बसल्या. तहसिलदारांनी दोन दिवसात तात्पुरता रस्ता व निवडणुक संपल्यानंतर कायमस्वरुपी बैलगाडी रस्ता देण्याचे मान्य केल्यानंतर देवईबाई यांनी अमरण उपोषण मागे घेतले.
दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पाच खोऱ्यांचा नैसर्गिक प्रवाह आडवुन शेतात पाणी सोडल्या बाबतचा अर्ज तहसिलदारांना दिला. दिनांक २५ नोव्हेबर २०१९ रोजी रस्ता व शेतात सोडलेल्या पाणी विषयी केलेल्या अर्जासंबंधी विचारणा केली असता, तुमच्या शेतात पाणी सोडले असेल तर भात लावा असे ऊध्दटपणे ऊत्तर दिले म्हणुन देवईबाई तुकाराम जायभाये ह्या आज दिनांक ९ डिसेंबर २०१९ पासुन शिवणी सज्जातील गट नं ६४९ मधील स्वतःच्या शेतात अमरण उपोषणास बसल्या आहेत.