अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना या जीवघेण्या संकटात ज्याप्रमाणे डॉक्टर,पोलिस यांची भुमिका महत्वाची आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात या संकटाचा सामना गावचे सरपंच,पोलिस पाटील , आणि स्वस्त धान्य दुकानदार हे करीत आहेत. त्यांची कामगिरी आणि संवेदनशील भुमीका नजरेआड करून चालणार नाही.तेव्हा राज्य सरकारने सरपंच,पोलिस पाटील आणि स्वस्त धान्य दुकानदार या वर्गात कामा करणाऱ्या लोकांना 25 लाख विमा संरक्षण मिळून दयावे आशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे.की,या संकटाचा सामना प्रत्येकजण जबाबदारी निहाय करीत आहे.सरकारने डॉक्टर, पोलिस,ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी विमा संरक्षण जाहिर केले.मात्र या संकटाचा सामना ग्रामीण भागात करतांना गावोगावचे सरपंच,पोलिस पाटील ही मंडळी सुध्दा जीव धोक्यात घालून गावचे संरक्षण करत असल्यामुळेच कोरोना हे संकट वेशीबाहेर ठेवण्यात यश येत आहे.गेल्या एक महिण्यापासून जागता पहारा देत आहेत.या शिवाय प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानदार सुध्दा संवेदना ठेवून मालाचे वितरण करत असल्याने गोरगरिबांच्या अन्न-पाण्याची सोय होत आहे.खरे तर दुकानदारांचे अनेक प्रश्न आहेत.पण, बिचारे आपले प्रश्न मागे ठेवून ग्रामीण भागात धान्य वितरण करत आहेत.खरे तर शहरात साधन सुविधा खुप असतात त्या प्रमाणात गावात सुविधा नसतात.तरी पण,सरपंच मंडळी जिवाचे रान करीत आहे.औषध फवारणी,गरिबाला मदत करणे,अरोग्य जपणे आदी महत्वाची कामे होत असल्याने ग्रामीण भागात संकट कमी प्रमाणात आहे , मग असे असतांना या लोकांची कामगिरी नजरेआड करता येणार नाही,राज्य सरकारने ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी यांना विमा संरक्षण दिले.त्याच धर्तीवर जे लोक कोरोना या संकटाच्या लढाईत मैदानावर काम करतात त्यामध्ये ही मंडळी पण आहे.तेव्हा राज्य सरकारने सरपंच,पोलिस पाटील,स्वस्त धान्य दुकानदारांना 25 लाख विमा संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.