ओबीसी फाऊंडेशन इंडियाच्या प्रयत्नांना यश ; राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ‘ओबीसी’साठी 36 वसतिगृहासाठी 200 कोटींच्या निधीची तरतूद

बीड:आठवडा विशेष टीम― ओबीसी फाऊंडेशन इंडिया या सामाजिक संघटनेच्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षा स्वातीताई मोराळे यांनी जेंव्हा महाराष्ट्र भर विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता प्रकर्षाने असे जाणवले की,शिक्षण घेत असताना जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची गैरसोय होत आहे.याचीच दखल घेत मोराळे यांनी मुख्यमंत्री महोदय मा.देवेंद्र फडणविस यांची वैयक्तिक मुंबई मध्ये भेट घेऊन त्यांना याबाबतची माहीती दिली. निवेदन पत्रे देऊन सतत पाठपुरावा चालूच ठेवला.तसेच नवी मुंबई मध्ये डाॅक्टर,वकील व पत्रकार बांधवांच्या गुणगौरव सोहळ्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमांमध्ये तसेच अहमदनगर मधील UPSC/ MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या अधिकारी वर्गांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमा दरम्यान स्वाती मोराळे यांनी बोलताना सांगितले होते की,प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हाॅस्टेल ची सोय करण्यात यावी,ही मागणी प्रामुख्याने केलेली होती.याचेच फलित म्हणजे दि.18 रोजी राज्य शासनाने हंगामी अतिरिक्त अर्थसंकल्प 2019-20 चा जाहीर केला.या हंगामी अर्थसंकल्पामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यांमधील वसतिगृहासाठी 200 कोटी रू.निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. तसेच नवी मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार स्पर्धा परिक्षा केंद्रे स्थापन करावीत.ही मागणी राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये 50 कोटींच्या निधीची तरतूद करून मान्य केली गेली. या दोन्ही मागणीसाठी ओबीसी फाऊंडेशन इंडिया व पदाधिकारी सतत प्रयत्नशील होते. यासाठी मा.एकनाथरावजी खडसे ( मा.महसूल मंत्री ), मा.पंकजाताई मुंडे ( महिला व बालविकास मंत्री ), खासदार रक्षाताई खडसे, मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे,मा.आमदार नरेंद्र दराडे यांनी सतत पाठींबा दिला आहे.मी या सर्वांचे आभार मानते.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि अर्थ मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचेही आभार व्यक्त करते.माझ्या बरोबर संघटनेमधील सहकारी बांधवांनी सतत प्रयत्न व पाठपुरावा केला,सर्वांचे स्वागत व अभिनंदन करते असे स्वाती मोराळे यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *