-
पहाटे ३.३० च्या सुमारास पाकिस्तान मध्ये हवाई हल्ले
नवी दिल्ली | वृत्तसंस्था : भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी मिराज २००० ही लढाऊ विमानं पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून गेली आणि त्यांनी दहशतवादी तळांचा नायनाट केला आहे.जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा भारतीय वायुदलाने हल्ला केला आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास १००० किलो स्फोटकांचा वापर करत हे तळ नष्ट करण्यात आले आहेत.भारतीय वायुदलाच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांच्या मदतीने ही धडक कारवाई करण्यात आली.जैशची कंट्रोल रुम उध्वस्त केल्याचीही माहिती समोर येत आहे.याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.
IAF Sources: 12 Mirage 2000 jets took part in the operation that dropped 1000 Kg bombs on terror camps across LOC, completely destroying it pic.twitter.com/BP3kIrboku
— ANI (@ANI) February 26, 2019