रस्तेमहर्षी आ.भीमराव धोंडे यांचे प्रयत्नाने आष्टी पाटोदा शिरुरच्या रस्त्यांना अर्थसंकल्पात 10 कोटी मंजुर

आष्टी:आठवडा विशेष टीम― रस्तेमहर्षी लोकप्रिय आ भीमराव धोंडे यांचे प्रयत्नाने आष्टी पाटोदा शिरुर या तालुक्यातील विविध रस्त्यांना सन 2019-20च्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दि.18 जुन रोजी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आष्टी पाटोदा शिरुर या तालुक्यातील विविध रस्त्यांना 10 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे या मधे आ.भीमराव धोंडे यांनी विषेशतः पाटोदा व शिरुर या तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न या मधे मार्गी लावला आहे पाटोदा तालुक्यातील प्रमुख मार्ग साकत ते पाटोदा या रस्त्यासाठी 1 कोटी 60 लाख तर पाचंग्री ते दासखेड या रस्त्यासाठी 2 कोटी रु. शिरुर तालुक्यातील हिंगेवाडी फाटा ते जाटनांदुर या मार्गासाठी 2 कोटी 50 लाख रु तसेच शिरुर ते सिंदफणा या रस्त्यासाठी 2 कोटी 50 लाख रु निधी मंजुर केला असुन आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया ते फत्तेवडगाव या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी 1 कोटी 80 लाख रु मंजुर झाले आहेत या रस्त्यांमुळे पाटोदा शहराला जामखेड बाजार पेठ जवळ झाली असुन दासखेड करांची अनेक दिवसांपासूनची रस्त्याची दैनाफिटली आहे शिरुर तालुक्यातील सिंदफणा व जाटनांदुर हे प्रमुख मार्ग असुन रस्त्यामुळे शिरुर तालुक्याती दळवळणाला चालणा मिळणार आहे आष्टी तालुक्यातील मिरजगाव बारामती कडे जाणार्या या रस्त्याच्या मंजुरी मुळे कडा मिरजगाव बाजार पेठ एकमेकांना जोडल्या जाणार आहेत आष्टी मतदारसंघातील आणखी काही रस्ताला निधी लवकर मंजुर करु असा विश्वास व्यक्त करुन ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील अर्थ मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आ.भीमराव धोंडे यांनी आभार मानले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *