अखिल भारतीय किसान मजदुर सभेच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ.उमेश लाड

बीड जिल्हा कार्यकारीणीची निवड

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अखिल भारतीय किसान मजदुर सभेच्या कार्यकारीणी निवडी संदर्भात बुधवार,दि.19 जून रोजी अंबाजोगाईत जिल्ह्यातील युवकांची सर्वसाधारण सभा कॉ. डी.एम.धस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी बीड जिल्हा कार्यकारीणी निवडण्यात आली.त्यात जिल्हाध्यक्षपदी कॉ.उमेश बालाजी लाड यांची निवड करण्यायत आली आहे.सर्वसमावेश कार्यकारीणीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

अंबाजोगाई शहरात अखिल भारतीय किसान मजदुर सभेची कार्यकारीणी निवडीसंदर्भात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी कॉ. उमेश बालाजी लाड,
कॉ.सचिन गंगाधर शेप(उपजिल्हाध्यक्ष ),कॉ. महेश भारती(सचिव) कॉ.शुभम शिंदे (सहसचिव) तर कार्यकारीणीत इतर पदाधिकारी यांचाही समावेश आहे.तसेच सदस्य म्हणुन कॉ. सोमेश गित्ते,कॉ.संपत कांबळे आदींची ही निवड करण्यात आली आहे.सदर निवडी या अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. अशोक घायाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्या.या प्रसंगी नवनियुक्त कार्यकारीणीला शुभेच्छा देत उपस्थित युवकांशी संवाद साधताना कॉ. अशोक घायाळ म्हणाले की,देशात लोकशाहीचा पराजय झाला आहे. जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाने कष्टकरी समाज मानसिकदृष्ट्या विभागला आहे. भांडवलशाही, साम्राज्यवादी लोकांच्या हितासाठी धर्मांध राज्यकर्ते काम करत आहेत.देशात बेरोजगारी व शेती व्यवसाय धोक्यात आल्याने आर्थिक विषमता वाढली आहे.त्यामुळे आता जात आणि धर्म बाजूला ठेवून आर्थिक व सामाजिक समतेच्या लढाईसाठी वर्ग संघर्ष करण्याची गरज आहे. क्रांतीकारी लढा उभा करण्याचे आवाहन यावेळी कॉ.अशोक घायाळ यांनी केले.या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारीणीचा सत्कार करण्यात आला. बैठकीस बीड जिल्ह्यांतून 200 हून अधिक युवक,कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.