छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी – गेल्या १५ वर्षांपासून रमाई फाउंडेशनच्या वतीने आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र मासिक रमाईच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा रुजविण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. रमाई जयंती व रमाई मासिकाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला रमाई आणि बाबसाहेबांची नात रमा आंबेडकर-तेलतुंबडे या उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी स्थानिक तापडिया नाट्यमंदिर येथे सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. संजय मुन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून प्रसिध्द लेखिका सुषमा पाखरे (वर्धा), आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम (नांदेड) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. प्रदीप रोडे, ऍड. धनंजय बोरडे, ऍड. के. ई. हरिदास, ऍड. लता बामणे, ऍड. एस. आर. बोडदे, प्राचार्य सुनील वाकेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा रमाई मासिकाच्या संपादक डॉ. रेखा मेश्राम, दैवशीला गवंदे, ललिता खडसे, शोभा खाडे, बेबीनंदा पवार, जयश्री सरोदे, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ. वंदना पाटील, मंगल मुन, राजकन्या गोंडाणे, नेहा बनसोडे, डॉ. ललिता गिर्हे, रत्नकला बनसोड, गंगाबाई सुरडकर, संघमित्रा खंडाळकर, सरला सदावर्ते आदींनी केले आहे.