धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर गडचिरोली स्फोट प्रकरणी DYSP निलंबित ; शहिदांच्या कुटुंबातील व्यक्तीस 8 दिवसात नोकरी मिळणार

मुंबई दि.२१:आठवडा विशेष टीम― १ मे रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट केला. ज्यात १५ जवानांनी प्राण गमावले. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी dysp शैलेश काळेवर कडक कारवाईची / निलंबनाची मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचीही मागणी केली.

या दोन्ही मागण्या मान्य करताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी dysp काळे यास निलंबीत करण्यात येत असल्याची घोषणा केली तसेच तसेच शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीस नौकरी देण्याची कारवाई 8 दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *