अंबाजोगाई: तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे यश ;निकालामध्ये मुलींची आघाडी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा-2019 मध्ये घवघवीत यश संपादन करत निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शहरातील टी.बी. गिरवलकर पॉलीटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा एप्रिल-मे 2019 मध्ये घेण्यात आली.या परीक्षेत संस्थेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. नुकतेच अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाले असून त्यात द्वितीय, चतुर्थ आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणुक दाखवली आहे. पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग या शाखेचा अंतिम वर्षाचा निकाल (84 टक्के),इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग (67 टक्के),मेकॅनिकल इंजिनिअरींग (70 टक्के),कॉम्प्युटर इंजिनिअरींग (72 टक्के),इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (60 टक्के) इतका लागला आहे. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरींग या शाखेमधील तृतीय वर्षाचा विद्यार्थी चि. गायकवाड माहेश्वर दिलीप (91.29 टक्के) त्याच शाखेतील तृतीय वर्षात शेख शोएब हमीद (90.12 टक्के), खंडेलवाल सुरज नंदकिशोर (85.41 टक्के),द्वितीय वर्ष मेकॅनिकल शाखेतून यादव प्रविण राजकुमार (67.38 टक्के),पवार अतुल शिवदास (65.88 टक्के),कांबळे अजिंक्य भाऊसाहेब (64.63 टक्के) तसेच प्रथम वर्ष मेकॅनिकल शाखेतून जोशी आनंद व्यंकटेश (82 टक्के), कु.शर्मा मोनिका महेश (73.47 टक्के),देशमुख अविराज अर्जुन (56.40 टक्के),तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या शाखेमध्ये कु.मुंगनाळे अमृता श्रीराम (91.88 टक्के),मोरे मानसी योगीराज (91.38 टक्के),कु.सोमवंशी नम्रता दौलतराव (90.63 टक्के), कु.आगळे अम्रता बाबासाहेब (90.38), द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग शाखेतून कु.मुंडे अंकिता श्रीराम (88.00 टक्के),कु. रूद्राक्ष आकांक्षा (87.20 टक्के),चि. कळसकर प्रथमेश (85.07 टक्के) तर याच शाखेत प्रथम वर्षात पांचाळ ऋषीकेश (86.38 टक्के),कु. चव्हाण सिमा बालासाहेब (81 टक्के), कु.रूद्राक्ष आकांक्षा (76.27 टक्के).,तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेतून डुबे यश संतोष (89.65 टक्के),कु. बाभुळगावकर दिव्या उमाकांत (87.35 टक्के),कु.कुलकर्णी प्रतिक्षा प्रशांतराव (87.06 टक्के), तसेच द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेतून कु.चव्हाण श्रद्धा संभाजी (75 टक्के),कु.गरड ऋषी अजित (74.33 टक्के), कु.आपेट सायली सतिष (72.33 टक्के),तसेच तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनियरींग या शाखेतून कु.टेकाळे तेजस्विनी वसंत (85.31 टक्के),कु. माचवे पुजा बालासाहेब (79.38 टक्के),कु. कदम फाल्गुणी पांडुरंग (79.06 टक्के),द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनियरींग शाखेतून कु.खरोबे तेजस्विनी वसंत (85.31 टक्के) कु.कुलकर्णी वैष्णवी राजेंद्र (81.20 टक्के), कु.देशमुख वैष्णवी विठ्ठलराव (78.27 टक्के),प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनियरींग या शाखेतून कु.धुमाळ ऋतुजा अण्णासाहेब (81.13 टक्के),कु. कराड भाग्यश्री माणिक (79.63 टक्के),कु. आंबेकर जान्हवी सतिष (77.50 टक्के).,तृतीय वर्ष इन्फॉरमेशन टेक्नालॉजी या शाखेतून कु.नायबळ दुर्गा मंचकराव (70.00 टक्के),कु.बंग ऋतुजा घनःशाम (68.00 टक्के) या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी यावर्षी ही उत्कृष्ट गुण मिळवून आपल्या गुणवत्तेची चुणुक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे.निकालामध्ये यावर्षीही मुलीच पुढे आहेत.संस्थेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी ही कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. यावर्षी तर पुणे,मुंबई येथील नामांकित कंपनीच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये संस्थेच्या 25 विद्यार्थ्यांची नौकरीसाठी निवड झाली आहे.तसेच टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे अनेक विद्यार्थी सध्या विविध नामांकित खाजगी कंपन्यात,शासकीय सेवेत मोठ-मोठ्या हुद्यांवर काम करीत आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरअप्पा बिडवे व सर्व सन्माननीय सदस्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम.बी.शेट्टी,तंत्रनिकेतचे विभागप्रमुख बी.एम. पटने,अब्दुल हलीम, व्हि.व्हि.कन्नुर,एस.एस. कंगळे,एस.बी.घोलप, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.