सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यातील गलवाडा या गावात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने तसेच यामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तीन घरांना आग लागली.सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे झालेल्या नुकसानीत तीन कुटुंब उघड्यावर आले असून ऐन दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था या कुटूंबाची झाली आहे. शासनाने लवकरच यांना नुकसान भरपाई करून देण्याची मागणी या जनतेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
गलवाडा येथील शामराव जाधव, धनराज जाधव,दत्तू जाधव या तिघांच्या घराला आग लागली या आगीत संपूर्ण घरासह अन्नधान्य, संसाराचे साहित्य व विद्यतु उपकरणे असे प्रत्येकी एक लाखाच्या दरम्यान नुकसान झाले आहे सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
तसेच शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने इतर ग्रामस्थाच्या घरातील टीव्ही, पंखा, व इतर उपकरणे यात शॉर्ट झाली आहेत.या बाबत महसूल विभागाकडून या घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे