सोयगाव: तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ.सोळुंके तर शहरध्यक्ष रवींद्र काळे यांची फेरनिवड

सोयगाव,ता.२२: ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचं अध्यक्षपदी डॉ.इंद्रसिंग सोळंके यांची तर पक्षाच्या शहराध्यक्ष पदी रवींद्र काळे यांची फेर निवड करण्यात आली आहे.पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रंगनाथ काळे आणि द्वारकाभाऊ पाथ्रीकार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन दोघांना निवडीचे पत्र बहाल करण्यात आले.
या निवडीचे अंबादास मानकापे,लेखराज उपाध्याय,नंदू बापू सोळंके,डॉ.सुभाष बोरसे,चंद्रकांत पाटील,डॉ.पी एम पाटील, दशरथ झलवार,अनीस तडवी,डॉ.इब्राहिम देशमुख,करीम देशमुख, राजेंद्र आहिरे,रवी काळे,राजू दुतोंडे,दिपक देशमुख,शेषमल जाधव,जगन्नाथ गव्हांंडे,शे.मिसार,शे.रफिक,संतोष राजपूत, चरणसिंग नाईक,सुपडु बताळे,चंदू काळे,श्रीराम चौधरी,नेमीचंंद जाधव,लुकमान शेठ,चुन्निलाल चव्हाण, पंजाबराव देशमुख, डॉ.सय्यद जफर आदींनी अभिनंदन केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.