सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून खरिपाच्या पेरण्यसाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने बांधावर खते व बियाणे मिळवून देण्याची योजना शासनाने नुकतीच सुरु केली आहे.परंतु अद्याप कृषी निविष्ठांना मान्यता न मिळाल्याने बियाण्यांची नोंदणी करूनही केवळ खतांवर योजनेची बोळवण घालण्यात आली आहे.
आगामी खरीप हंगामासाठी खरीप उत्पादक शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करून बांधावर खते व बियाणे मिळवून देण्याची योजना शासनाने काढली आहे.या योजनेत सोयगाव तालुक्यात १९७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन बियाण्यांसाठी नोंदणी केली आहे,परंतु शासन पातळीवर अद्याप कृषी निविष्ठांना विक्रीसाठी मान्यता न देण्यात आल्याने बियाण्यांऐवजी शेतकऱ्यांना खतेच मिळत आहे.बांधावर खते योजनेत सोयगाव ताल्कुक्यात शेतकरी गटांना अद्याप पर्यंत ९ टन खतांचे वितरण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.मात्र बियाण्यांची नोंदणी करूनही बियाणे मिळत नसल्याने यंदा पेरण्या कराव्या कशा याबाबत मात्र शेतकऱ्यांना प्रश्न उपस्थित झाला आहे.सोयगाव तालुक्यात युरियाची हंगामाआधीच २३०० गोण्यांची मागणी नोंद करण्यात आली आहे.सात शेतकरी गटांनी तब्बल ९ टन विविध खतांची उचलही केली आहे.बियाणे नोंदणी मध्ये मुग,उडीद,ज्वारी,सोयाबीन,कापूस आदि पिकांच्या बियाण्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.परंतु बियाणे मात्र बांधावर पोहचविण्यात शासनाला यश आलेले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
0