औरंगाबाद: सोयगावातील कुऱ्हाड हल्ला प्रकरण,आरोपीची हर्सूलला रवानगी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शहरातील काळे नगर भागातील घराबाहेर अंथरुणावर झोपलेल्या तरुणावर जुन्या भांडणातून राग मनात धरून कुऱ्हाडीने हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिरामण श्रीराम बावस्कर यास सोयगाव पोलिसांनी शुक्रवारी सोयगाव न्यायालयासमोर हजार केले असता त्याची हर्सूलला रवानगी करण्यात आली.
शहरातील काळे नगर भागात जुन्या भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर झोपेत असलेल्या नंदू सुरडकर याचे गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून वार जबड्यावर बसल्याने या हल्ल्यात नंदू सुरडकर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली होती,याप्रकरणी जखमीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कुऱ्हाडीने घाव करणाऱ्या हिरामण बावस्कर याच्यावर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास शुक्रवारी सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हर्सूलच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी तातडीने भेट दिली आहे.पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष पाईकराव,सागर गायकवाड,अविनाश बनसोडे,आदि तपास करत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.