औरंगाबाद: सोयगावला तालुकास्तरीय योगा,तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये मोठा प्रतिसाद

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या तालुका क्रीडा संकुलावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगा प्रशिक्षण केले यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.दरम्यान प्रारंभी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तालुकास्तरीय योगां प्रशिक्षण शाळेत मार्गदर्शन केले.
सोयगाव तालुक्यातील तब्बल ९४ प्राथमिक आणि १५ माध्यमिक शाळांमध्ये १७ हजाराच्यावर विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले,आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे,विस्तार अधिकारी राजेंद्र फुसे यांनी भेटी देवून सहभाग नोंदविला.सोयगावला संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांनी योग प्रशिक्षण केले,यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक नाईकवाडे,उपप्राचार्य डॉ.शिरीष पवार,उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे,तहसीलदार प्रवीण पांडे,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळे,नायब तहसीलदार मकसूद शेख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनवणे,आदींसह पंचायत समिती,कृषी,सामाजिक वनीकरण,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग,आदि विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *