औरंगाबाद: सोयगावात एकाची गळफास घेवून आत्महत्या

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव शहरात एकाने राहत्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून दोरीने गळफास घेतल्याची घटना शनिवारी उघड झाली आहे.याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन सदाशिव कुलकर्णी(वय ४५)असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.राहत्या घरात आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,वडील,एक भाऊ,बहिण असा परिवार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.