महाराष्ट्र राज्यसामाजिक

अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पारधी समाजातील मुला-मुलींना एक महिन्याचे मोफत भरती पूर्व प्रशिक्षण

प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील मुलामुलींना मूळ प्रवाहात आणणे करिता अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे वतीने दि.०१/०२/२०१९ रोजी पासून एक महिन्याचे मोफत भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.सदर भरती पूर्व प्रशिक्षणामध्ये मुला मुलींना वेगवेगळे राहण्याची सुविधा,आहार तज्ञांचे सल्ल्यानुसार सकाळचा चहा नाष्टा,दोन वेळचे जेवण,किट साहित्य ,अंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण वर्ग व संगणकीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तरी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की,सदर मोफत प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त पारधी समाजातील १२ वी पास मुलामुलींनी लाभ घ्यावा.तसेच ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे अशा इच्छुक मुलामुलींनी दि २८/०१/२०१९ रोजी पर्यंत पोलीस मुख्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक ०२४१ २४१६११४ किंवा मो.नं.९०१११६११३३ या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करावी. सोबत येताना दोन पासपोर्ट फोटो,आधार कार्ड व जातीच्या दाखल्याची प्रत आवश्यक आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.