भगवानगड गहिनीनाथगड पंढरपूर “भक्तीमार्ग” रस्ता मंजुर करा―आ.भीमराव धोंडे

आष्टी:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्राच्या संत परंपरेतील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे थोर संत भगवान बाबा व वामनभाऊ महाराज यांचा भगवानगड गहिनीनाथगड पंढरपूर या नविन रस्ता मंजुर करु
यास “भक्तीमार्ग” असे नामकरण करावे अशी मागणी आष्टी मतदारसंघाचे आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांना दिलेल्या निवेदनात आ.भीमराव धोंडे यांनी म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका येथे असलेले गहिनीनाथ गड हे नाथसंप्रदयाचे व संत वामनभाऊ महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान असुन येथे देश विदेशातील भक्तगण येत असतात त्यांच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील संत भगवानबाबा याचे भगवानगड देवस्थान हे असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे हे दोन्ही संतांच्या दर्शनास भाविकभक्त येत असतात परंतु या दोन्ही देवस्थानांना जोडणारा रस्ता सरळ नाही म्हणुन अनेक अडचणींना तोंड देत भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात व या दोन्ही संत दर्शनानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यावे अशी मान्यता आहे आणि म्हणुनच भगवानगड-गहिनीनाथ-पंढरपूर असा मार्ग मंजुर करावा व यास भक्तीमार्ग असे नामकरण करावे ही मागणी करुन आ.धोंडे म्हणतात 65 कि.मी.च्या हा रस्ता भगवानगड-रा.मा.54-खरवंडी-जवळवाडी-तीनखडी-गाडेवाडी-पिंपळगांवटप्पा-बीरडवाडी-वणवेवाडी-पाटसरा-खलाटवाडी-हातोला-गहिनीनाथगड-चिचोली-चिखली-जोगदंडवाडी-पांगुळगव्हाण-पोखरी ते नगरबीड रा.मा 561 रोड पर्यंत व्हावा येथून पंढरपूर सरळ आहे या रस्त्याला हायब्रीड अन्युटी योजनेतून मंजुर व्हावा या मार्गामुळे ग्रामीण भागातील छोटे छोटे गावे मुख्य रस्त्यांवर येऊन या भागातील उद्योग धंद्यांना चालणा मिळेल रोजगार उपलब्ध होतील व पर्याटनाला देखील मोठी संधी उपलब्ध होईल या दोन्ही देवस्थान स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे श्रध्दास्थान होती राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी या दोन्ही देवस्थानांच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे त्याच मुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडणारा हा भक्तीमार्ग लवकरात लवकर मंजुर करावा अशी आग्रही मागणी ना चंद्रकांतदादा पाटील यांचे कडे केली असुन केद्रीक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी पैठण पंढरपूर या पालखी मार्गाला मंजुरी दिली होती ते काम आज पूर्णत्वास आहे या मार्गासाठी देखील केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना भेटणार असल्याचे आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.