पाटोदा:गणेश शेवाळे― भारत सरकारची शेतकरी हितार्थ खरीप हंगाम पीक विमा 2019-20 योजना मिळविण्यासाठी आष्टी पाटोदा शिरुर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2019-20 चा पीक विमा भरणे सुरू झाले आहे.आपली पेरणी झाली असल्यास लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यावा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी असलेली पिके,सोयाबीन कापूस, तूर, मूग, उडीद,ज्वारी,सूर्यफूल,ईत्यादी असुन पीकविमा भरण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे आधार कार्ड,स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र सातबारा,नमुना 8 अ(होल्डिंग), बँक पासबुक लागत असुन पीकविमा भरण्यास नका करू ऊशिर,त्वरित विमा भरून राहा बेफिकीर असे आवाहन आष्टी, पाटोदा,शिरुर मतदारसंघाचे शेतकऱ्यांच्या हिताचे नेते जयदत्त धस यांनी केले आहे.
0