औरंगाबाद: ईश्वर चिठ्ठीवर अपक्षाने मारली बाजी,सोयगाव नगर पंचायतीचा धक्कादायक निकाल

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव नगर पंचायतीच्या पोट निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीवर अपक्ष उमेदवार सिकंदर तडवी यांनी बाजी मारली असून या धक्कादायक निकालाची सोमवारी जिल्हाभर चर्चा सुरु झाली होती.
प्रतिष्ठेची लढत समजल्या जाणार्या सोयगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्र-१६ मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत सोमवारी मतमोजणी करण्यात आली असता शिवसेनेच्या भारती इंगळे व अपक्ष उमेदवार सिकंदर तडवी या दोघांना समसमान(१३४)इतकी मते मिळाल्याने अखेरीस निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला असता,ईश्वर चिठ्ठीवर सिकंदर तडवी यांनी नशीब अजमावले आहे.त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर विजयी झालेल्या अपक्ष उमेदवाराची शहरभर डोक्यावर घेत विजयी मिरवणूक काढण्यात आली.या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सिकंदर तडवी यांनी बाजी मारल्याने आता नगर पंचायतीत अपक्षाचा प्रवेशही झाल्याने सोयगावात राजकीय खळबळ उडाली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांचं अध्यक्षतेखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,सुधीर जहागीरदार,सतीश देशमुख आदींनी कामकाज पहिले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.