श्रमजीवी कामगार संघटनेच्या झेंड्याखाली गोलानी टेम्पो युनियनची स्थापना

श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष मा.श्री.विवेक भाऊ पंडित याच्या हस्ते युनियन बोर्डाचे उदघाटन

वसई:आठवडा विशेष टीम― वाळीव भागात अनेक इंडस्ट्रीस असून येथे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टेम्पो चालक – मालक युनियन अस्तित्वात होती. परंतु ती युनियन टेम्पो-चालक मालकांच्या प्रश्नांकडे लक्ष न पुरवता स्वतः चे हित साधण्याचा प्रयत्न करत असल्याने टेम्पो-चालक मालक यांनी श्रमजीवी कामगार संघटनेचे सभासद होऊन श्रमजीवी कामगार संघटनेच्या झेंड्याखाली युनियन सुरू केली. गोलनी टेम्पो युनियन च्या या बोर्डाचे उद्घाटन श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष मा .श्री. विवेक भाऊ पंडित यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्याम कुमार मिश्रा ( सल्लागार -गोलनी टेम्पो युनियन ) यांनी भाऊंसोबत जोडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
श्रमजीवी कामगार संघटनेच्या परिवारात नव्याने आलेल्या गोलनी टेम्पो चालक-मालक युनियनच्या सर्व सभासदांचे विवेक भाऊ पंडित यांनी प्रथम स्वागत केले. संघटनेचे काम हे आपल्या शरीराप्रमाणे असले पाहिजे.पायात काटा भरला तर हात तो काढायला गेला पाहिजे. याचं प्रमाणे संघटनेत एकजुटीने काम केले पाहिजे .असे मोलाचे उद्गार विवेक भाऊ पंडित यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करते वेळी काढले.
या प्रसंगी श्रमजीवी कामगार संघटनेचे खजिनदार कु. महेश धांगडा, श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री. रामचंद्र रोज , जिल्हा युवक उपप्रमुख श्री. सुजित घरत , तालुका युवक प्रमुख श्री. प्रदीप वाढण, ता. विभाग सचिव श्री .गणेश भुरकुंड, गोलनी टेम्पो युनियन अध्यक्ष श्री. किरण गायकर, उपाध्यक्ष श्री. गणेश पवार , सचिव श्री. गणेश वेदक तसेच इतर पदाधिकारी , कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.