अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.तसेच जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी शपथ घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतीवीर निर्माण करणारे वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्याही जयंतीनिमित्त 12 बालमित्रांना बुधवार,दिनांक 18 नोव्हेंबर रोजी शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
येथील स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.वाचन संस्कृती वाढावी आणि शिक्षणाची आवड निर्माण व्हावी हा एकमेव उद्देश समोर ठेवून प्रतिष्ठानचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर,माजी प्राचार्य डॉ.डी.एच.थोरात,डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार 12 बालमित्रांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजक प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी दिली आहे.