शेतकरी पिकविमा मदत केंद्राचा शुभारंभ―शिवसेना पाचोरा तालुका

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, पाचोरा तालुका शिवसेना युवसेनाच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या वतीने शेतकरी पिक विमा मदतकेंद्राचा शुभारंभ दि.२५/६/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना कार्यालय,पाचोरा येथे शेतकरी बांधवांकडून फॉर्म भरून घेण्यात आले.
शेतकरी बांधवानी गेल्या वर्षभरापासून पिकविमा काढला. परंतु पिकविमा कंपनी किंवा बँकेकडून आद्यपपावेतो शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा रक्कम जमा झालेली नाही. बळीराजाला दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बळीराजावर आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून शिवसेना खंबिरपणे बळीराजाच्या पाठीशी आहे. म्हणून शेतकरी बांधवांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. भविष्यात विमा परतावासाठी शिवसेना शेतकरी बांधवासमवेत पिकविमा कंपनी व बँकेच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन छेडणार आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी मोठयाप्रमाणावर पिकविमा अर्ज भरून द्यावेत असे विनम्र आवाहन गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, बंडू चौधरी शहरप्रमुख,यांनी या प्रसंगी केले.
यावेळी अँड.दिनकर देवरे, पदमसिंग राजपूत जि.प.सदस्य, दिपकसिंग राजपूत जि.प.सदस्य, गणेश पाटील,शरद पाटील, पप्पू राजपूत,बंडू चौधरी, अनिल आबा पाटील, संजय गोहिल नगराध्यक्ष,सतीश चेडे, बापू हटकर,आनंद पगारे ,संदीपराजे पाटील,अनिकेत सूर्यवंशी, हिलाल दादा पाटील,सौरभ चेडे, अण्णा चौधरी, जावेद शेख, मतीन बागवान,बापू वाणीसर,जितू पेंढारकर,समाधान पाटील , भगवान घुले. शंकर गवळी .बापू भिल, ज्ञानेशवर पाटील,राजू राठोड,सागर पाटील ,शिवलाल पाटील, , पौलाद कुमावत, झिपरू पाटील,नाना वाघ, दीपक पाटील, वैभव राजपूत,नितीन पाटील, विजय भोई,तथा शेतकरी बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते. जवळपास १७८ शेतकऱ्यांनी अर्ज भरून घेतले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.