ओनलाईन शेती उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक,पहिल्याच दिवशी तलाठी लॉगीनवरुण उतारा मिळेना

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―खरीप हंगाम पीककर्ज,नवीन वर्षाचा पीकविमा या धावपळीत ऐन पेरण्यांच्या धावपळीत शेतकऱ्यांना तलाठी लॉगीनवरून ओनलाईन उतारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी मोठी धावपळ उडाली होती.दरम्यान तलाठ्यांजवळ ओनलाईन शेती उतारा देण्यासाठी सज्जेत प्रिंटरच नसल्याने गोंधळ उडाला होता.
शासनाने नुकतेच महाभूअभिलेख शेती उतारे बंद करण्याचा निर्णय घेवून तलाठ्याकडून घेतलेले उतारेच शासकीय कामांसाठी वापरण्यात येतील असा महत्वपूर्ण निर्णय घेताच पहिल्याच दिवशी पीकविमा आणि पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना उतारे न मिळाल्याने मोठी धावपळ उडाली होती.दरम्यान सोयगाव तालुक्यातील अठरा तलाठी सज्जांपैकी केवळ बारा तलाठ्यांना लॅपटोप व प्रिंटर मिळाले असल्याने उर्वरित तलाठ्यांना प्रिंटर नसल्याने लॉगीन वरुण उतारे देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या,त्यातच सोयगाव तालुक्यात काही गटांचे क्षेत्र अद्याप ओनलाईन न झाल्याने त्यांच्या नावांचे उतारेच निघाले नाही.तहसीलच्या महसूल विभागाकडून तातडीने काम न झालेल्या क्षेत्राची माहिती संकलित करण्याचा काम हरती घेण्यात आले होते.

शासनाच्या निर्णयाचा पेल्याच दिवशी फज्जा उडाला असून शेतकऱ्यांना महत्वाच्या कामांसाठी उतारे न मिळाल्याने सोयगाव तालुक्यात ऐन पेरणीच्या कालावधीत शेताच्या उताऱ्यांचा गोंधळ झाला होता.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.