कृषी विभागाचा खरीप पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम ,दोन गावांना बियाण्यांचे मोफत वितरण

सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भरडधान्य उत्पादन कार्यक्रम सन २०१९-२० खरीप हंगामाचे पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला.पहिल्या टप्प्यात धनवट व वडगाव येथे येथे मका पिकाचे बियाणे वाटप व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी,सुदाम घुले यांचेसह कृषी विभागाचे कर्मचारी यांच्या वतीने तालुक्यात खरीप हंगाम पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवला जात आहे.या पीक प्रात्यक्षिक मध्ये शेतकऱ्यांना बियाणे व बीज प्रक्रिया साठी जैविक औषधी वाटप करण्यात आल्या.वडगाव येथे सरपंच चद्रकालाबाई मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी समाधान चौधरी कृषी सहाय्यक,नितीन सोमवंशी,नितेश सोमवंशी आदी उपस्थिती होती.धनवट ता.सोयगाव येथे येथे रोहिणी वळवी कृषी सहाय्यक यांच्या हस्ते मका बियाणं वाटप करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.