जरंडी,घोसला शिवारात मुगावर मावा,चीकट्यारोग ;
ऐन उत्पन्नात शेतकरी हवालदिल
सोयगाव ,ता.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडीसह परिसरात सुरु असलेल्या सततच्या पावूस आणि वाढलेल्या ढगाळ वातावरणाच्या प्रादुर्भावात जरंडी आणि घोसला या शिवारात मुग पिकांवर मावा आणि चीकट्या प्रादुर्भाव वाढल्याने ऐन उत्पन्न हाती येण्याच्या कालावधीत मुगाचे पिके संकटात सापडली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेवटच्या क्षणी मुगाचे उत्पन्न हातात करून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पोळा सणाचा खरिपाच्या उत्पन्नाचा पहिला हंगाम म्हणून मुगाची ओळख आहे.या मुगाला सध्या चांगला भाव आहे.परंतु शेंगा परिपक्व होत असतांनाच अचानक बदलत्या वातावरणाने मुगावर मावा आणि चीकट्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे मुग तोडणी ऐवजी पुन्हा फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.मागील हंगामा पेक्षा यंदाच्या हंगामात मुगाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे.परंतु वातावरणाने घात करून अचानक प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे उत्पन्न घेण्याच्या काळात पुन्हा निसर्गाचे संकट कोसळले आहे.
हिरव्या शेंगा पिवळसर-
काही भागात अति पावसाच्या फटक्यात मुगाच्या हिरव्यागार असलेल्या शेंगा आणि मुगाची झाडे पिवळी पडली असून या पिवळी पडण्याचे रहस्य मात्र उलगडत नाही त्यामुळे पुन्हा अडचणीचा डोंगर शेताकायांपुढे वाढला आहे.