बीड:आठवडा विशेष टीम―आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले ७ जण कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी गावात जाऊन आज (दि.१८) परिस्थितीचा आढावा घेतला. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बोटावर मोजण्याइतके च लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून येतात. त्यापैकी आमदार सुरेश धस हे एक आहेत. आष्टी तालुक्यातील एकाच कुटुंबातील सात जण आढळल्यानंतर हादरा बसला होता. ७ कोरोनाग्रस्तापैकी आज एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी गावात जाऊन परिस्थीतीची माहिती घेत ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. त्याचप्रमाणे पोलीस व प्रशासन यांच्याकडून केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली. तालुक्यातील नागरीकांची जबाबदारी आता वाढली आहेसर्वांनी काळजी घ्या, घरातच रहासुरक्षित रहा, असे आवाहन आमदार धस यांनी केले आहे.
0