Breaking: बीडच्या भरधाव सागर ट्रॅव्हल्सचा झाला कोळसा

बीड दि.२८:आठवडा विशेष टीम― बीड येथून नागपूरकडे जात असलेल्या भरधाव ‛सागर’ ट्रॅव्हल्सला शुक्रवारी (दि.२८) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास अमरावतीजवळील मालेगाव रस्त्यावर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीत गाडीचा जागीच कोळसा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बीड येथील नागपूरकडे मध्यरात्री निघालेली ‛सागर’ ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच.२३ जे ९००) भरधाव वेगात असताना अमरावतीजवळ
मालेगाव रस्त्यावर गाडीने अचानक पेट घेतला. चालक व काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना तातडीने ‛आपतकालीन’ दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले. गाडीला समोरून लाग लागली होती. गाडीचा अक्षरशः कोळसा झाला असून बीडसह अन्य सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.