बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा ; सावित्रीबाई फुलेंवर शेण आणि दगड फेकण्याचा ईतिहास असलेल्या पुणेकरांनी नाकाने कांदे सोलु नये

बीड दि.०३: बीड जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याने कलाक्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात ,प्रशासकीय पातळीवर तसेच न्यायिक क्षेत्रांमध्ये एवढेच नव्हे तर सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी गरुड झेप घेतलेली आहे .स्नेहभाव जपणारा जातीय सलोखा जोपासणाऱ्या या बीड जिल्ह्याला काही लोक बदनाम करत आहेत.बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा या प्रमुख मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी आणि, “कोथरुडचं बीड होऊ देणार नाही” पुण्यामध्ये बीडची बदनामी करणा-या लागलेल्या फलकाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०३ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, पांडुरंग हराळे,शेख मुबीन, शेख मुस्ताक, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, बीड जिल्हा सचिव इंटक सखाराम बेंगडे सहभागी होते. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.

बीड जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याने कलाक्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात, प्रशासकीय पातळीवर तसेच न्यायिक क्षेत्रांमध्ये एवढेच नाही सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वी गरुड झेप घेतली आहे.स्नेहभाव जपणाऱ्या जातीय सलोखा जोपासणाऱ्या या बीड जिल्ह्याला बाहेरच्या मीडियाने सर्वाधिक बदनाम केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड अमानुष असून मानवतेला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी बीडकरांची इच्छा आणि मागणी आहे. मात्र काही इलेक्ट्रॉनिक मीडियांनी बीड जिल्ह्यात येऊन जिल्ह्याच्या अस्मितेचे आणि एकात्मतेचे लचके तोडले आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा महाराष्ट्रात बिहार पेक्षा वाईट अशी जाणीवपूर्वक रंगवण्यात आली. एका घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात वाईट ठेवण्याचा जो प्रकार सध्या सुरू आहे. तो थांबवणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्याची बदनामी थांबवण्याची जबाबदारी आम्हा सर्व बीडकरांची आहे. तसेच बिघडलेले वातावरण पुन्हा एकच चांगले करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे या सामाजिक जाणिवेतून ” बीड जिल्ह्याची बदनामी थांबवावी या प्रमुख मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०३ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर शेण आणि दगड फेकणा-या पुणेकरांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे: डॉ.गणेश ढवळे

पुण्यात बीड जिल्ह्याच्या विरोधात बॅनर लागावे ही घटना अत्यंत हास्यस्पद आहे. साऱ्या ब्रह्मांडाचे ज्ञान केवळ आपल्याच मस्तकात आहे. अशा अविर्भावात राहणाऱ्या पुणेकरांनी निदान दुसऱ्यांना नाव ठेवणे बंद करून स्वतःच्या जिल्ह्याचा, गावचा विचार करावा पुण्याच्या स्वयंघोषित तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाची बीडकरांना गरज नाही. पुण्यात दररोज केवळ महिलांवर नव्हे तर संपूर्ण मानवतेवर अत्याचार होताना पाहायला मिळतात. हेच पुणेकर कोथरूडचे बीड होऊ देणार नाहीत असे म्हणत पुणेकरांनी आता नाकाने कांदे सोडणे बंद करावे. विशेष म्हणजे ज्या स्वयंघोषित समाजसेवकांनी बीड जिल्ह्यात ठाण मांडून बीड किती भयानक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात स्वयंघोषित समाजसेवकांनी आता पुण्यामध्ये फिरून तेथील गल्लीबोळात दररोज काय होते हे महाराष्ट्र समोर आणावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
पुण्यामधील कोयता गॅंग अमली पदार्थांची तस्करी महिला वगैरे होणारे अत्याचार लोटमार मारामारी आणि पुण्याचा जर इतिहास जर पाहिला तर जोशी अभ्यंकर हत्याकांड, रंगा बिल्ला यांना पोसणारा ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शेण दगड मारणारा,महात्मा ज्योतिबा फुलेंवर मारेकरी घालणारा, दलितांच्या गळ्यात मडके आणि कमरेला खराटा बांधणारा ,महात्मा गांधींना मारणारा नथुराम यांना पोसणारा, पेशवाईत घटकंचुकी सारखे रंगेल अतिशय निर्लज्ज खेळ चाललेला आणि पुण्यात देशातील सर्वात जुनी आणि कुप्रसिद्ध अशी बुधवार पेठ आदीमुळे कुप्रसिद्ध असणाऱ्या पुणेकरांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे अशी संतप्त प्रतिज्ञा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *