बीड: काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा

इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै पुर्वी अर्ज सादर करावेत-जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी

अंबाजोगाई: ऑक्टोबर-2019 ची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.तसेच 6 जुलै-2019 पुर्वी विहीत नमुन्यातील आपला उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल करावा,कारण इच्छुक उमेदवारांची नावे ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस दिली जाणार आहेत.काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे वतीने सुचित करण्यात आले आहे की,ऑक्टोबर -2019 महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणूकीमध्ये समविचारी व धर्मनिरपेक्ष,राजकीय पक्षांना,एकत्र आणुन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न राज्यस्तरावर होत आहे. महाराष्ट्रात समविचारी मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची बोलणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.मित्र पक्षांसोबत जागा वाटपा बाबतचा अंतिम निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून लवकरच घेतला जाणार आहे. बीड जिल्ह्यात अनेक मातब्बर काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यास तयार आहेत.अशा इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून ती जिल्हा निवड मंडळा मार्फत इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून प्रदेश कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी रूपये 15,000/- (अक्षरी पंधरा हजार रूपये माञ) आणि मागासवर्गीयांसाठी (अनु.जाती,अनु.जमाती) रूपये 10,000/- (अक्षरी दहा हजार रूपये माञ) याप्रमाणे रक्कम पक्षनिधी म्हणून डी.डी.द्वारे प्रदेश कार्यालयाकडे जमा करावी लागेल.विहीत नमुन्यातील उमेदवारी अर्ज हे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कडे बीड व अंबाजोगाई येथील ‘बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयात’ मिळतील.
इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यांत भरलेले त्यांचे अर्ज हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,कार्यालय,टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,मुंबई-400025 यांचेकडे द्यावेत.तसेच इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज हे पोस्ट, कुरियर,इमेल (office@ mahacongress.
com) अथवा फॅक्स (फॅक्स क्रमांक- 022-24225733)
याद्वारे पाठवता येतील.
तरी ऑक्टोबर 2019 ची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.