सोयगाव: पावसाची विश्रांती,कोळपणीच्या कामांना सोयगावला वेग

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुकाभर सोमवारीही पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांच्या आंतरमशागतीच्या कामांनी वेग घेतला असून आंतर मशागतीच्या कामांमध्ये शेतकऱ्यांनी भुसभुशीत झालेल्या जमिनी कोळपणी करतांना शिवारात चित्र सोमवार पासून दिसत आहे.
दरम्यान सोयगाव मंडळात समाधानकारक आणि सावळदबारा मंडळात तुरळक पावूस झाला असतांना बनोटी मंडळ मात्र अद्याप तहानलेले आहे,परंतु हंगामाच्या पहिल्या कोळपणीचं कामांना तालुकाभर वेग घेतला असून,शिवारे मात्र कोळपणीच्या कामांनी गतिमान दिसत आहे.दरम्यान काही भागात झालेल्या समाधानकारक आणि काही भागात तुरळक पावसाने बारीक-बारीक तन उगवल्याने कोळपणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोळपणी करण्यासाठी कपाशी आणि मका पिकांच्या मुळांना धक्का न लागता कोळपणी करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

दरम्यान पावसाने पूर्णपणे उसंत घेतल्याने जमिनीच्या असलेल्या ओलाव्यावर पिकांची मदार अवलंबून असतांना त्यातच कोळपणी करतांना कोवळी पिके जखमी न होण्याची मोठी काळजी घेण्याचे तगडे आवाहान शेतकऱ्यांसमोर उभे राहिलें आहे.

सोयगाव तालुक्यातील ४३ हजार हेक्टर पेरणीयोग्य असून यामध्ये तब्बल ३० हजार हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली असून मागील वर्षाच्या हंगामा पेक्षा यंदाच्या हंगामात तब्बल कपाशी पिकांचे एक हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झाली असल्याचे चित्र आहे.

काही भागात पिकांच्या निंदनीच्या कामांनीही वेग घेतला असल्याने सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामाच्या पहिल्या आंतर मशागतीच्या कामांनी झपाट्याने वेग घेतल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.