चळवळीतून बाबासाहेबांचा वैचारिक पाईक निर्माण व्हावा―प्रा.प्रदिप रोडे

भीमदूत : व्हि.जे. आरक प्रेरणा पुरस्काराने उ.कृ जोशी,मंगलाताई मोरे सन्मानित

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अंबाजोगाई: समाजाला योग्य दिशा देण्याचे काम व्ही.जे. आरक यांनी केले. प्रतिकुल परिस्थितीत समाजासाठी कार्य करून सामान्य माणसासाल न्याय दिला.आज प्रामाणिक कार्यकर्त्यांची चळवळीला गरज आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मी पणाची भावना काढून टाकावी स्वतःच्या पैशातून महापुरूषांच्या जयंत्या साजरा कराव्यात.आरक साहेबांच्या नांवे दिला जाणारा पुरस्कार हा प्रेरणा देणारा असून चळवळीतून बाबासाहेबांचा वैचारिक पाईक निर्माण व्हावा. प्रा.गौतम गायकवाड यांनी आरक यांचा चरित्रग्रंथ लिहून खुप मोठे कार्य केले आहे. तर जोशी कुटुंबियांचा करावा तेवढा गौरव कमीच आहे.या शब्दांत प्रा.प्रदिप रोडे यांनी आपले विचार मांडले.ते येथील व्हि.जे.आरक सेवाभावी संस्थेच्या वतीने व्हि.जे.आरक जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार,दि. 1 जुलै रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात भीमदूत : व्हि.जे.आरक प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

यावर्षी उ.कृ जोशी, मंगलताई माधव मोरे यांना ‘भीमदूत:व्हि.जे. आरक प्रेरणा पुरस्कार-2019′ प्रदान करण्यात आला.तर या सोहळ्यात समाजभुषण राजेंद्र घोडके,‘आधार माणुसकीचा’ उपक्रमाचे अ‍ॅड.संतोष पवार, कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे, विभागीय सल्लागार संजय साळवे,एम.एम. गायकवाड व पत्रकार नागेश औताडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच मयुरी उद्धव गायकवाड, रोहित निसर्गंध,आदर्श निसर्गंध,प्रणव जोगदंड,अमिषा दामोदर सोनवणे, प्रतिक लंकेश वेडे, यशवंत व्यंकटेश चामनर,भाग्यश्री भगवान वाघमारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदिप रोडे (बीड) हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संजय बनसोडे उपस्थित होते.प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना उ.कृ.जोशी म्हणाले की, हा आपला सत्कार नसुन कृष्णाजी यशवंत जोशी ऊर्फ छबु गुरूजी यांचा सत्कार आहे. आरक साहेब जेंव्हा अंबाजोगाईत आले तेंव्हा ते प्रथम आमच्या घरी आले असे सांगुन त्यांनी आरक साहेबांच्या विविध आठवणी या प्रसंगी विषद केल्या.तर यावेळी बोलताना मंगलाताई मोरे यांनी सांगितले की,या ह्रद्य सत्काराचे खरे मानकरी हे मोरे सर आहेत.हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करते. अंबाजेगाईत प्रा.माधव मोरे,प्रा.एस.के. जोगदंड,देविदास सोनवणे,श्रीराम सोनवणेे यांच्या सारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांमुळे आंबेडकरी समाजाला संरक्षण मिळाल्याचे मंगलाताई म्हणाल्या.तर डॉ.संजय बनसोडे, अ‍ॅड.संतोष पवार, बालासाहेब सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन करताना जगन सरवदे यांनी सांगितले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेश सर्वस्व मानून सुमारे 62 वर्षांपुर्वी व्ही.जे.आरक हे भुसावळ येथील नौकरी सोडून ते बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात आले.येथे दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य आर्पण केले.तत्कालीन दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचारा विरोधात आंदोलन केले. दलित समाजाला संघटीत करून त्यांचे आधार झाले.दलित समाजाच्या स्वंरक्षणाचे ते कवच होते. अंबाजोगाई परिसरात आंबेडकरी चळवळीची पायाभरणी व बांधणी त्यांनी केली.त्यामुळे ते आंबेडकरी चळवळीचे सेनापती म्हणुन ही ओळखले जातात. व्हि.जे.आरक ते प्रा.माधव मोरे सरांपर्यंत बीड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा प्रेरणादायी आहे.त्यांच्या जीवन कार्याच्या परिचयातून फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणुन सामाजिक,शैक्षणिक, राजकिय,वैचारिक, क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी ‘भीमदूत : व्हि.जे. आरक प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येतो.यावर्षी ही हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सरवदे यांनी दिली.प्रांरभी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय लंकेश वेडे व भारत सातपुते यांनी करून दिला.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार जगन सरवदे यांनी केले. बळीराम उपाडे यांनी स्वागतगीत सादर केले. उपस्थितांचे आभार प्रा.श्रीपती वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्हि.जे. आरक सेवाभावी संस्था व संयोजन समितीचे प्रा.गौतम गायकवाड (अध्यक्ष), जगन सरवदे (सचिव), प्रा.प्रदिप रोडे (उपाध्यक्ष),प्रा.बी.एस. बनसोडे (कोषाध्यक्ष) तसेच बी.एच.कांबळे, प्रा.श्रीपती वाघमारे, संजीवनी लंकेश वेडे, भारती अनंत वेडे,लंकेश वेडे, विकास वाघमारे नांदडीकर,आकाश वेडे,एम.एम. गायकवाड,संजय जोगदंड,संजय शिंगणकर,बालासाहेब सोनवणे आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.