औरंगाबाद जिल्हाहेल्थ

औरंगाबाद: आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता योग प्राणायम शिबीराचे आयोजन

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग, प्राणायम, ध्यान व सुदर्शन क्रिया या ४ दिवशाच्या शिबिराचे आयोजन केले आहे. सादर शिबीर हे zoom app द्वारे online घेण्यात येईल. सकाळी ७.३० ते ९.३०, सायंकाळी ५.०० ते ७.०० शिबिराचा कालावधी राहील.
या शिबिराचे पूर्व तयारीचे प्रात्यक्षिक मोबाइल WhatsApp वर पाठविण्यात येईल. शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा कोविड १९ या लढ्यामध्ये सहभाग असल्यामुळे त्यांचे रोग प्रतिकार शक्ती मध्ये वाढ होण्याचे दृष्टीने आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आयोजित योग, प्राणायम, ध्यान व सुदर्शन क्रिया या ४ दिवशाच्या शिबिरामध्ये सहभाग करून घेण्यात येईल. सकाळच्या शिबिरात सह्भाग घेणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयात उशिरा येण्यास व सांयकाळच्या सत्रात सहभाग घेणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयातून लवकर जाण्यास परवानगी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले. अधिक माहितीसाठी नंदकिशोर औटी, मो क्र ९०११०१३३३३, शिवशंकर स्वामी, मो क्र ९४२२२१०३७१ श्रीमती छाया भालेकर, मो क्र ९८८१०४९३९६ यांच्याशी संपर्क साधावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button