ब्रेकिंग न्युज

पिक विमा च्या रक्कमेपासून वंचित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मातोश्रीकडे रवाना

चाळीसगाव:आठवडा विशेष टीम― शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभरातील पिक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांची तक्रार असलेले फॉर्म भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला आहे आणि हप्ताही भरला आहे मात्र गेल्या वर्षभर दुष्काळ असूनही शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपन्यांनी या शेतकऱ्यांना कुठलेही नुकसान भरपाई दिले नाही अशा शेतकऱ्यांचे सविस्तर माहिती व तक्रार असलेले फार्म भरून घेऊन चाळीसगाव शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचेमार्फत शिवसेना भवन मुंबई येथे रवाना करण्यात आले आहेत यात तालुक्यातील 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले फॉर्म भरून चाळीसगाव शिवसेना तालुका कार्यालयाकडे जमा केले आहेत यासाठी शिवसेना तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण यांनी संपूर्ण ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना मार्फत शेतकऱ्यांना आवाहन करून शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले आहे यामुळे तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना लवकरच विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी यासाठी चाळीसगावात चार दिवस थांबून मार्गदर्शन केले तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ जिल्हा उप समन्वयक महेंद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव कलाने तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे तालुका संघटक सुनील गायकवाड विभाग प्रमुख दिनेश विसपुते उपतालुकाप्रमुख हिम्मत निकम उपतालुका प्रमुख दिलीप पाटील माजी पंचायत समिती सदस्य दिलीप पाटील पांडुरंग बोराडे अण्णा पाटील प्रभाकर उगले रोहित जाधव नाना शिंदे बापू लोणेकर भोरसचे शाखाप्रमुख अनिल पाटील सचिन ठाकरे संदीप पाटील एडवोकेट प्रमुख एरंडे माणिक गुंजाळा बापू भोई ,ऋषिकेश देवरे, नंदू गायकवाड आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.