औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: शेतीचे उतारे पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना भेटा,जरंडीच्या तलाठ्याचा शेतकऱ्यांना सल्ला,महसूल विभागात खळबळ

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―शेतीचे उतारे पाहिजे असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना भेटा,महसूल विभागाने मला उतारे काढण्यासाठी लागणारी डी .एस.सी पुरविलेली नसल्याने मी आज उतारे देऊ शकत नसल्याचे खळबळजनक वक्तव्य करून अजब सल्ला जरंडी सज्जेच्या तलाठ्याने शुक्रवारी चक्क शेतकऱ्यांना दिला असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.आठवडाभारातून सज्जेवर एकदा येणाऱ्या या अजब तलाठ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सोयगावसह तालुकाभर भूमिअभिलेख पोर्टलवरील शेतीचे उतारे बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना तलाठ्याकडून लॉगीन झालेले शेतीचे उतारे शासनाने ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलेला असतांना जरंडी सज्जेच्या हद्दीतील पाच गावातील शेतकऱ्यांना संबंधित तलाठी शेतीचे उतारे देण्यासाठी हेळसांड करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान या महसूल कर्मचाऱ्याला शेती उतारे काढण्यासाठी पुरविण्यात येणारी यंत्रणाच पुरविली नसल्याचा हा कर्मचारी सांगत असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.जरंडी तलाठी सज्जेत कंकराळा,माळेगाव,पिंपरी,रावेरी,धिंगापूर हि सहा गावांची क्षेत्रे येत असून तालुक्यातील मोठी सज्जा म्हणून या साज्जेची ओळख आहे,परंतु या ठिकाणी आलेला महसूल कर्मचारी शेतकऱ्यांना उतारे न देता उर्मट भाषा वापरत असल्याने शेतकरी या कर्मचाऱ्याला तंग झाले आहे.त्यामुळे या महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कारवाईचा संकेत गोलमाल-

या प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी,तहसीलदार आणि नायब तहसीलदार(महसूल)या पर्यंत चौकशीची मजल मारली असता,या चारही वरिष्ठांनी केवळ चौकशी करण्याचे संकेत देवून शेतकऱ्यांची आजची वेळ मारून नेल्याचे चित्र आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.