ब्रेकिंग न्युज

लोंढ्ररी येथे विजेचा शाॅक लागुन बैल ठार, बैल गाडीत बसलेले शेतकरी बचावले

पहुर ता जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथून जवळ असलेल्या लोंढ्ररी गावांमध्ये शेतातून घरा कडे येतं असताना बैल गाडीत बसलेले शेतकरी व मजुर विजेचा शाॅक लागुन बचावले. यात एक बैल ठार झाला दुसरा बैल जखमी झाला.
सविस्तर माहिती अशी की लोंढरी येथील शेतकरी ईश्वर बाबुराव चौधरी छाया ईश्वर चौधरी संगीता राजू सावकारे राजू सावकारे व सोपान चव्हाण हे सर्व शेतकरी बैलगाडीतून शेतातून घराकडे येत असताना गावाजवळ असलेल्या ट्रांसफार्मर नंबर 6 परिसरातील विद्युत प्रभाव उतरविला होता याची कल्पना न आल्याने व बैल खेचल्यामुळे बैल गाडीत बसलेले सर्व पुरुषांनी गाडीतून उड्या मारून तसेच गाडीत बसलेल्या महिलांनी आरडओरड केल्यामुळे तेथे आजूबाजूला असलेले अनिल राजाराम चौधरी या ग्रामस्थाने या सर्व महिलांना सुखरूप वाचवले बैलाला शॉक लागल्यामुळे एक बैल जागीच ठार झाला असून तर दुसरा बैल जखमी झाला आहे तात्काळ ग्रामस्थांनी लाईनमन यांना यासंदर्भात भ्रमणध्वनीवर माहिती दिली असता तात्काळ वीज पुरवठा खंडीत करण्यात आला वेळोवेळी याबाबत महावितरण कडे तक्रार केली असता तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सहा जणांचा जीव वाचला बैल ठार झाला दुर्दैवी घटना घडल्यामुळे शेतकरी ईश्वर बाबुराव चौधरी यांचा 50 हजार रुपयांचा हा बैल होता हंगामात बैलाचा जीव गेल्यामुळे शेतकऱ्याला अक्षरशा रडू कोसळले या घटनेची माहिती मिळताच कमलाकर पाटील माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकारी व सहाय्यक फौजदार अनिल अहिरे पंचनामा केला.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.