बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या मनातील आमदार चांगदेव गिते जाणार का विधानसभेत ?

पाटोदा: आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभा मतदारसंघात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली असून एका तरुणाने निवडणूक लढविण्यास पुढाकार घेतला आहे.बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी येथील रहिवाशी असलेले श्री.चांगदेव गौतम गिते यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातुन विधानसभेसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचे ठरवले आहे आणि निवडणूकिसाठीची पूर्व तयारी देखील जोमात सुरू असल्याचे समजते आहे.

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील मातब्बर नेत्यांना तोंड देत ही निवडणूक त्यांना जिंकून दाखवायची आहे.सामान्य कुटुंबातील तरुण जेव्हा व्यवस्थेकडे पाहून स्वतः निवडणूक लढवण्याचे ठरवतो तेव्हा जनता देखील त्याव्यक्तीस कश्या तर्हेने पाठिंबा देते याचे चित्र आज ह्या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळत आहे.

"सर्वसामान्य लोकांचा सर्वसामान्य आमदार" या इलेक्शन स्लोगन खाली चांगदेव गिते यांनी मतदारसंघात वातावरण तयार करण्याची मशाल पेटविली आहे.त्यांच्या या धाडसामुळे पाटोदा तालुक्याला न्याय मिळणार असल्याचे देखील राजकीय जाणकारांकडून समजत आहे.

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात आमदार सुरेश धस,आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर अशी मातब्बर मंडळी आहे.सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे चांगदेव गिते यांचे विधानसभा निवडणुकीतील आव्हान तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

समाजकारणाने सुरुवात करून जनतेच्या कल्याणासाठी राजकारणात उतरून आमदार होण्याचे स्वप्न बाळगणारा तरुण जेव्हा ह्या मतदारसंघाचा आवाज बनेल तेव्हा मात्र विकास आणि सर्व स्थरावरून समृद्ध असा मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही.

कोण आहेत चांगदेव गिते ?

चांगदेव गिते यांनी आपले फार्मशीचे शिक्षण चालू असतानाच सामाजिक कार्याची आवड असल्याने अनेक वेगवेगळ्या स्वरूपातील समाजबांधवांना मदत,रक्तदान शिबिर,सामाजिक लढे,शेतकऱ्यांसाठी आंदोलने,मोर्चे इत्यादी मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.इतकेच नव्हे तर स्वतःच्या लग्नात देहदान,अवयवदान,रक्तदान शिबिर आयोजित केले होते.त्यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रश्न सुटावा म्हणून स्वतःची डिग्री देखील विकायला काढली होती.सामाजिक बांधिलकी असलेला हा तरुण आता विधानसभेत जाऊन तरुणांचा आवाज बनण्याच्या वाटेवर आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.