परळी दि.१०:आठवडा विशेष टीम―विधान परिषद विरोधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कोणताही बडेजाव न करता कार्यकर्त्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन स्वतः धनंजय मुंडे यांनी केले आहे.
15 जुलै या वाढदिवसाच्या दिवशी धनंजय मुंडे हे आपल्या परळी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. मात्र शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी हार ,शाल, केक, बुके असे कोणतेही सामान आणू नये . केवळ शाब्दिक शुभेच्छा व्यक्त कराव्यात . बडेजाव करणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून सामाजिक उपक्रम या निमित्ताने आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.