अंबाजोगाई:रणजित डांगे―
सध्या कोरोना या जागतिक महामारीने कळस गाठला आहे.दिवसेंदिवस मृतांचा व कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे.सरकार कडूनही अनेक पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत.अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.पोलीस,डॉक्टर,पत्रकार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवत आहेत.दरम्यान या संदर्भात मुला,मुलींनी ऑनलाईनवर एकत्रित येवून संवाद नाट्य हे जनजागृती करण्यासाठी प्रभावी साधन ठरत असून बीड आणि लातुर प्रशासनाने “गो कोरोना गो” नाटिकेची दखल घेऊन त्याचा जनजागृतीसाठी स्विकार केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पातळ्यांवर सतत संशोधन,प्रबोधन,साहित्य निर्मिती सोबतच आता संवादरूपी नाटिकेद्वारे ही समाज जनजागृतीचे काम चालू आहे.त्यामुळे मनोरंजनातून गंभीर विषयावर मार्मिक भाष्य करून समाजप्रबोधनात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून “गो कोरोना गो” हे प्रबोधनात्मक हलके फुलके स्कीट तयार करण्यात आले.हे स्कीट आपल्याला हसवत-हसवत कोरोना साथजन्य रोगाबाबत समाजातील विविध घटकांना जागरूक ही करेल.या स्कीटला प्रा.डाॅ.सीमा पांडे,आदिती निवर्गी,प्रेम कुलकर्णी व सागर कुलकर्णी या हौशी कलाकारांनी आपला आवाज दिला आहे.या स्कीटमध्ये एक कुटुंब आहे. आई-बाबा व त्यांची मुले, दिप्ती व दिपक.विशेष म्हणजे प्रेम कुलकर्णी याने बाबांचा आवाज दिला आहे तो पुणे येथे अभियांत्रिकी प्रथम वर्षात शिकत आहे. यापुर्वी “तप्तपदी” या चित्रपटातही त्याने भूमिका केली आहे.प्रा.डॉ.सीमा पांडे या गृह,अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून त्या सध्या वी.एम.वी कॉलेज नागपूर येथे कार्यरत आहेत.तर सागर कुलकर्णी हा पुणे येथे बीसीएस अभ्यासक्रम प्रथम वर्षात शिकत असून आदिती निवर्गी (उदगीर) हिने बारावीची परीक्षा दिली आहे.या सर्व कलाकारांचा आवाज हा त्यांच्याच घरी रेकॉर्ड करण्यात आला आहे.त्याचे सुश्राव्य संगीत संयोजन प्रकाश बोरगावकर यांनी केले आहे.या स्कीटचे निवेदन व लेखन अश्विनी निवर्गी (उदगीर) यांनी केले आहे.प्रेम व सागर कुलकर्णी हे येथील मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांचे सुपुञ आहेत.या छोट्याशा नाटिकेची दखल घेत नगरपरिषद अंबाजोगाई यांनी समाजप्रबोधनसाठी या स्कीटची निवड केली आहे.त्यामुळे अंबाजोगाई करांनाही या मनोरंजना बरोबरच प्रबोधन करणा-या या स्कीटचा लाभ मिळत आहे.यातील सहभागी कलावंतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.