आठवडा विशेष | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील सरपंच पांडुरंग नागरगोजे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातून घडलेले पांडुरंग नागरगोजे हे पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे सरपंच आहेत.त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा विकास साधला आहे.
भाजपा मध्ये काम करत असताना तळागळापर्यंत पक्षाचे विचार पोहचविण्याचे काम केल्यामुळे त्यांची रोहयो समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने व आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डुकर यांच्यासुचनेवरून त्यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा नुकताच सत्कार केला.श्री.पांडुरंग नागरगोजे यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.