आमदार सुरेश धस,धोंडे देतील का नवयुवकांना संधी ? ; उच्चशिक्षित चांगदेवासाठी वंचितांची भिंत चालणार

बीड:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा (२३१) मतदार संघ हा राज्यात मतदारांच्या दृष्टीने बलाढ्य व आकाराने विस्तृप्त आहे,आजघडीला या मतदारसंघात ३ लाख ६७ हजार ५१४ येवढे मतदान आष्टी मतदार संघात आहे, कारण या मतदारसंघात आष्टी,पाटोदा हे दोन्ही तालुके व शिरूर-कासार तालुक्यातील काही भाग मिळून आष्टी मतदारसंघ तयार होतो.
आष्टी-पाटोदा शिरूर हा विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून या मतदारसंघात अनेक दिगग्ज नेत्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले,यामध्ये प्रामुख्याने काही लोकप्रतिनिधींना अनेक वेळा या मतदारसंघात नेतृत्व करण्यास संधी मिळाली, त्यामध्ये १९८०-१९९५ या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांनी प्रतिनिधित्व केले, त्यानंतर १९९५-१९९९ या काळात साहेबराव दरेकर यांनी प्रतिनिधित्व केले, त्यांच्या मागोमाग राज्याचे माजी महसूलमंत्री सुरेश रामचंद्र धस यांनी १९९९-२०१४ या काळात मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.

या मतदार संघाचे जास्त काळ प्रतिनिधित्व हे आष्टी तालुक्यातील नेत्यांना लाभले आहे,अपवाद की १९७८-१९८० या दोन वर्षाच्या काळात पाटोदा तालुक्यातील लक्ष्मणराव जाधव यांना साधी मिळाली होती, आष्टीच्या नेत्यांना विजयी करण्यात नेहमीच पाटोदा तालुक्याचं योगदान मोठं आहे,तरीही पाटोदा तालुक्यातील नेत्यांना मतदान करून हात वर कारावे लागले आहेत.
मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर, दोन्ही आमदारांनी विकास हा बोटावर मोजण्याएवढा केला आहे,असे म्हणण्यास वावगे नसावे, कारण या मतदार संघातील ऊसतोडणीला जाण्याचे प्रमाण पाटोदा-शिरूर नेहमी अग्रस्थानी आहेत,आकारमानाने हा मतदार संघ खूप मोठा आहे,असे आपण मान्य करू पण एका-एका आमदाराने तीन-तीन टर्म आमदारकी भूषवली परंतु मतदार संघातील रस्ते, शेतीविषयक धोरणे व्यवसाय, शिक्षण, प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा दबाव व भ्रष्टाचार, हुकूमशाही या गोष्टी मतदार संघातील मतदारांना आता पाठ होऊन गेल्या आहेत, आत्ता कुठेतरी विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या काळात रस्ते व महामार्गाचे जाळे तयार होताना दिसत आहे, नाहीतर या अगोदर कित्येक वेळा खड्डे पडलेल्या रस्त्याचीच बिले बोगस उचलली गेल्याचे दिसून येते, सध्या जरी रस्ते व गावे जोडली जात असली तरी या मतदारसंघाला नेहमीच एक समस्या उभी राहते ती म्हणजे दुष्काळ व दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा करणे खूप जोखमीचे होऊन जाते, पण बोगसगिरीच्या नावाखाली कुठेतरी या परिस्थितीचा फायदा नेत्यांना व अधिकाऱ्यांना होत होता,मोजक्या कडा-आष्टी येथील काही शिक्षण संस्था व महाविद्यालये सोडली तर बाकी उच्च शिक्षणासाठी मतदारसंघ सोडावा लागतोय, ही वास्तव परिस्थिती या माजी व विद्यमान आमदारांच्या लक्षात येते नाही का..?,हा ही प्रश्न मतदाराला उभा राहतो,व या परिस्थितीला आमदार खासदारच नाही तर तालुका व जिल्हा पातळीवरील नेते काही शतप्रतिशत जबाबदार आहेत.
येत्या २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत मतदार संघातील उच्चशिक्षित नवं युवक विधानसभेच्या रणांगणात उभे राहत आहेत,त्यामध्ये प्रामुख्याने अग्रस्थानी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच विधानपरिषद आ.सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस शड्डू ठोकून भाजप पक्षाच्या बाजूने उभे राहण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे,कारण विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत,परंतु मतदार त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत व काही दिवसांपूर्वी भाजपाने सुरेश धस यांना विधानपरिषद आमदार केले आहे,त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असणार आहे,काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले तर निवडुक लढवण्यासाठी अग्रेसर आहेत. व आमदार सुरेश धस यांचे नातेवाईक असून सुद्धा कट्टर विरोधक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष बाळासाहेब आजबे की सतीश शिंदे यांना उमेदवारी जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.त्याचबरोबर पाटोदा तालुक्यातुन सुरेश अण्णा धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तेव्हा सर्व कार्यकर्त्यांशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण खंदे अण्णा समर्थक माजी सभापती महेंद्र गर्जे हे राष्ट्रवादी मध्येच राहिले,ते पक्षाने तिकीट दिल्यास इच्छुक आहेत,व त्यांनी पक्षाचा पात्रता अर्ज देखील भरला आहे, असे अन्य आष्टी-पाटोदा व शिरूर तालुक्यातील नवयुवक विधानसभेच्या रणांगणात उभे राहण्यास तयार आहेत.

  • पण सध्या चर्चा फक्त सर्वसामान्य लोकांचा सर्वसामान्य आमदार…?

हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील एक उच्चशिक्षित तरुण चांगदेव आबा गिते हा एक नवा चेहरा समोर येत आहे.ऊसतोड कामगार महाममंडळाच काय झालं..? मराठवाडा व बीड जिल्ह्यातील लोकांनी कुठपर्यंत ऊसचं तोडायचा, बीडचा रेल्वेचे काय झाले..? २०१९ला तुम्ही रेल्वेने प्रचाराला येणार होता, मुंडे साहेबांच्या सिडको येथील स्मारक कधी उभा राहणार..? अश्या अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करून मुख्यमंत्र्यांचा शो करणारा हा चेहरा आष्टी विधानसभेत हबुक ठोकत आहेत. वंचित लोकांनी सत्तेच्या रिंगणात का येऊ नये हा नैतिक आणि संवैधानिक अधिकार सांगत हा ऊसतोड कामगाराचा मुलगा थेट आमदारकीच्या फडात लंगोट बांधत आहे.सोशल मीडियावर निवडनुकीच्या उंबरठ्यातली तयारी चांगदेव गिते यांनी सुरू केली आहे, त्यामुळेच जनतेचा व नवमातदार यांची आजी माजी व विद्यमान आमदार सुरेश धस व भीमराव धोंडे यांच्याकडे नवयुवकांना संधी देण्याच्या चर्चा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुरू झाल्या आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.